मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला!

1415

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बंगळूरूहून आलेले विमान लँड होताना दुपारी अचानक धावपट्टीवर घसरून मोठा अपघात थोडक्यात टळला. त्यामुळे विमानाचा टायर फुटून आगीच्या टीणग्या उडून आग लागल्याने घबराट पसरली. सुदैवाने फेड‌एक्स कंपनीचे हे कार्गो विमान असल्याने थोडक्यावर निभावले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाहतूक साडेचार तास बंद करण्यात आली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेड‌एक्स कंपनीचे विमान उतरताना त्याच्या टायरला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सुदैवाने हे कार्गो विमान असल्याने कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर दुपारी अडीच ते सात अशी साडे चार तास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा ठप्प झाली. बंगळूरूहून आलेल्या फेड‌‌एक्स फ्लाईट-5033 कंपनीच्या विमानाचे 14/32 क्रमांकाच्या धाव‌पटीवर लँडिंग होताना अचानक विरूद्ध दिशेला वारे वाहू लागल्याने विमानांची घसरण होऊन विमानाचे टायर उष्णतेमुळे ‌झळाले. त्यामुळे अग्निशमन दलाने ही आग विझविली, त्यानंतर या अपघातग्रस्त विमानाला टोईंगकरुन धावपट्टीवरुन हटविल्यात आले. सायंकाळी सात वाजता वादळ शमल्यावर विमानसेवा पूर्ववत सुरू झाली.

आपली प्रतिक्रिया द्या