कमला मिल आग: मोजो बिस्त्रोचे मालक युग पाठक यांना अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

कमला मिल कम्पाउंडमधील आग प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘मोजो बिस्त्रोचे मालक युग पाठक यांना अटक केली आहे. पाठक यांच्याविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आग नेमकी कुठून व कशामुळं लागली हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. युग पाठक हे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के के पाठक यांचे पुत्र आहेत.

कमला मिल कम्पाउंडमध्ये २९ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्त्रो’ हे दोन पब जळून खाक झाले आणि १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ‘वन अबव्ह’च्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या आगीचे मूळ ‘मोजो बिस्त्रो’ होते. थूनच आगीला सुरुवात झाली. नंतर ही आग भडकत जाऊन ‘वन अबव्ह’लाही तिची मोठी झळ लागली, असे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे आता ‘मोजो बिस्त्रो’चे मालक युग पाठक व युग तुली यांच्यासह पबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर युग पाठक यांना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या