कामाठीपुऱ्यात महिलेची हत्या

505

कामाठीपुरा येथे एका 28 वर्षीय तरुणाने वाद घालत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची धारदार सुऱयाने वार करून हत्या केल्याची घटना घडली. महिलेवर वार केल्यानंतर आरोपीने मध्यस्थी आलेल्या एका इसमावर देखील वार केले. नागपाडा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. जीतेंद्र सिंग (28) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा जीतेंद्रचा रेश्मा शेख (30) नावाच्या महिलेशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या जीतेंद्रने रेश्माच्या गळा तसेच दोन्ही हातांवर वार करून तिला ठार मारले. यावेळी रेश्माच्या मदतीला पुढे आलेल्या शाहबाज मर्चंड याच्यावर देखील त्याने वार केले. याप्रकरणी रेश्माच्या पतीने तक्रार दिल्यानंतर नागपाडा पोलिसांनी आरोपी जीतेंद्रला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या