शताब्दी रुणालयात शिवसेनाप्रमुखांचे दिमाखदार तैलचित्र

पालिकेच्या कांदिवली पश्चिम येथील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘शताब्दी’ रुग्णालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तैलचित्र झळकले आहे. महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, शिवसेना सचिव आणि ‘टी-20 मुंबई लीग गव्हर्निंग काऊन्सिल’चे अध्यक्ष मिलींद नार्वेकर, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

ज्वलंत हिंदुत्वाचे सरसेनापती, मराठी माणसाच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुलिंग चेतवणारे आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नुकतेच राज्य सरकारकडून थोर राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. आता शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यांमध्येही शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येत आहे. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या विशेष पाठपुराव्याने आणि नगरसेविका शुभदा गुढेकर, नगरसेवक एकनाथ (शंकर) हुंडारे, विभानसभा संघटक संतोष राणे, शाखाप्रमुख मनोज मोहिते, निखील गुढेकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमप्रसंगी विभाग संघटक मनाली चौकीदार, कर्मचारी सेना अध्यक्ष बाबा कदम, उपायुक्त विश्वास शंकरवार आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका गीता भंडारी, प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, संतोष धनावडे, नंदू मोरे, किरण कोळी, अनिल भोपी, उपविभाग संघटक राजन निकम, राजू खान, उदय रुगानी, शाखाप्रमुख श्याम मोरे, हेतल रुगानी, अनिल बाईत आदींनी मेहनत घेतली.

आणखी आठ ठिकाणी लागणार तैलचित्र

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या पाठपुराव्याने शताब्दी रुग्णालयासह मालाड पूर्वच्या म. वा. देसाई रुग्णालय, स. का. पाटील रुग्णालय, मालाड पश्चिमचे चोक्सी रुग्णालय, चारकोपचे प्रबोधनकार ठाकरे चारकोप प्रसूतीगृह-रुग्णालय, कांदिवली पश्चिमचे भाब्रेकरनगर प्रसूतीगृह रुग्णालय, मालाड मढ पश्चिमचे प्रसूतीगृह रुग्णालय, कांदिवली पश्चिमचे पालिका आर/दक्षिण आाणि मालाड पश्चिमच्या पी/उत्तर पालिका कार्यालयात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावले जाणार आहे. दरम्यान, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या पाठपुराव्याने कांदिवली चारकोप चेक्टर 1 ते 8 मधील 850 वसाहतींना 1995 मध्ये प्रबोधनकार ठाकरे नगर असे नाव देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या