गणपती बाप्पा मोरया! चलो कोकण!! दिवसभरात 103 एसटी बसेस रवाना

586

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी बुधवारी 103 एसटी बसेस रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत 11 हजार चाकरमान्यांनी बसेसचे तिकीट आरक्षण केले आहे. 12 ऑगस्टपर्यंत जाणाऱ्यांसाठी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक नव्हते. परंतु 13 ऑगस्टपासून निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱयानाच एसटीचा प्रवास करता येणार आहे.

कोकणातील गणेशोत्सवासाठी 5 ऑगस्टपासून एसटी महामंडळाने गाडय़ा सोडण्यास सुरुवात केली. 4 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून एसटीच्या बसेसचे आरक्षण सुरू झाले होते. सुरुवातीला 5 ते 12 ऑगस्ट असे बसेसचे नियोजन होते. कारण कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी 10 दिवसांच्या होम क्कारंटाइनची अट देण्यात आली होती. परंतु आता 13 ऑगस्टनंतरही कोरोनाची टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना एसटीतून जाता येणार आहे. या काळातही ही सेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे.

तीन दिवस होम क्कारंटाइन

कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकाऱयांनीही नियमावली केली आहे. ही नियमावली लक्षात घेता उद्यापासून मुंबईतून कोकणात येण्यासाठी निघणाऱया प्रत्येक चाकरमान्याला 48 तास आधी करोना चाचणी करून घेण्याचे बंधन असणार आहे. त्यासोबतच जिह्यात पोहचल्यानंतर तीन दिवस होम क्कारंटाइन व्हावे लागणार आहे. कोरोना चाचणीची अट पूर्ण करून चाकरमान्यांना आपले गाव गाठावे लागणार आहे. अशा चाकमान्यांचा ओघ उद्यापासून पाहायला मिळणार आहे. एसटी बसने कोकणात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, इतर खासगी गाडय़ांनी येणाऱयांना ई-पास बंधनकारक आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांकरून 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या