गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

284

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.

कोकणातील टोलमाफीच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई., सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱया नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले.

  • टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱया नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तत्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे.
  • नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य सरकारच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास बंधनकारक आहे.
आपली प्रतिक्रिया द्या