कोरेगाव–भीमा हिंसाचार प्रकरण; शरद पवारांची साक्ष होणार!

616
sharad-pawar-new

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱया आयोगापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही साक्ष नोंदविण्यात येणार आहे. आयोगाचे वकील सतीश सातपुते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचे पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांची साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी ऍड. प्रदीप गावडे यांनी केली आहे. तसा अर्ज त्यांनी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांच्याकडे केला होता. त्यानंतर आयोगाने पवार यांना चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविण्यासाठी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार चौवशी आयोगासमोर सागर शिंदे यांनी यापूर्वी शपथपत्र दाखल करून म्हणणे मांडलेले आहे. त्यातच त्यांनी ऍड. प्रदीप गावडे यांच्यामार्फत सोमवार आयोगासमोर अर्ज सादर केला आणि त्यात विनंती केली की, शरद पवार यांना आयोगाने चौकशी साठी बोलवावे. त्यावर आयोगाने पवार यांच्या शपथपत्राबाबत शिंदे यांना अवगत केले. शरद पवार यांचे शपथपत्र आयोगासमोर यापूर्वीच आलेले आहे. त्यामुळे आयोग त्यांना बोलावणारच असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.

आयोगाच चौकशीच वेळापत्रक ठरलेले नसले, तरी शरद पवार यांना लवकरच साक्षीसाठी बोलावल जाण्याची शक्यता आहे. कारण चौकशी आयोगाला अल्पमुदतवाढ मिळाली आहे. केवळ तीन महिन्यांच्या मुदतवाढीपैकी आयोगाचा एक महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच या प्रकरणाशी संबंधित महत्वाच कामकाज होण्याची शक्यता असून लवकरच आयोगाकडून पवार यांना साक्षीबाबत समन्स पाठवण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पवारांच्या चौकशी मागणी का?

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं घेतली होती. पवारांना या दंगलीबद्दलची माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीन साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी ऍड. गावडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या