कोरोनाचे नियम पाळत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू

602

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला  असून, आजपासून प्रायोगिक तत्वावर सर्व मार्केट सुरू करण्यात आले आहे, सकाळी भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले आहे .

कोरोना च्या पार्श्वभूमीवर मार्केट च्या गेट वरच जाहीर सूचनांचा फलक लावण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टन्स म्हणजे सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

व्यापारी अडते दलाल खरेदीदार वाहतूकदार माथाडी कामगार मापाडी व इतर सर्व घटकांनी आवक गेट वर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून सॅनिटायझर लाऊन मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा सदर सुचने चे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मार्केट च्या आत येणाऱ्या गाडी वर सोडियम हायड्रोक्लोर्यीड ची फवारणी केली जात आहे. आज भाजी मार्केट मध्ये 15 गाड्या दाखल झाल्या या सर्व गाड्या निर्जंतुकीकरण करून आत सोडण्यात आल्या आहेत.

आज थोड्या प्रमाणात मार्केट सुरू करण्यात येत आहे. हळूहळू हे मार्केट पूर्णपणे सुरू करण्यात येणार असल्याची कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंडकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या