मुंबई – लोकल प्रवासासाठी बोगस ओळखपत्र बनविणारा अटकेत

लोकलची दारे सर्वसामान्यांना अद्याप खुली झाली नसल्याने अनेकजण गैरमार्गाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाची ओळखपत्रे बनवून बिनधास्त प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पश्चिम रेल्वेने अशा एका बोगस ओळखपत्र बनविणाऱयास विरार येथून अटक केली आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या अत्यावश्यक कर्मचारी तसेच नॉन पिकअवरमध्ये प्रवास करणाऱया महिलांसाठी 1201 फेऱया दररोज चालविण्यात येत आहेत. अशा एका कारवाईत लोकल प्रवासासाठी बनावट ओळखपत्र बनविणाऱयाचा छडा लावण्यात पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे. या व्यक्तीच्या फोन नंबर आणि टेलिग्राम संदेशावरून त्याच्या विरोधात वसई रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास केल्यानंतर विरार येथून 11 जानेवारीस या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कलम 420, 465 आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या