महिलांनो, मुलांसोबत लोकल प्रवास करू नका!

उपनगरीय लोकलमधून नॉन पिकअवरमध्ये सर्वसामान्य महिलांना प्रवास करण्याची मुभा 21 ऑक्टोबरपासून देण्यात आली आहे. मात्र, या महिला स्वतः सोबत आपल्या लहान मुलांना घेऊन प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ महिलांना प्रवासाची अनुमती दिलेली असल्याचे स्पष्ट केले असून रेल्वे सुरक्षा बलाला लहान मुलांना रेल्वे स्थानकात प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे प्रशासनातर्फे 21 ऑक्टोबरपासून नॉन पिकअवरमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत केवळ सर्वसामान्य महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीचा गैरफायदा काही महिला घेत असून आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन त्या लोकलमधून प्रवास करीत असल्याचे दिसून आल्याने त्यांना रोखण्यासंदर्भात आरपीएफला आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या