आचारसंहितेनंतर चारच दिवसांत 1.36 कोटींची रोकड, 1.68 कोटींची दारू जप्त

231
liquor Liqueur

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर आयकर, उत्पादन शुल्क व पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अवघ्या चार दिवसांच्या कारवाईत आतापर्यंत 3.79 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 1.36 कोटींची रोख रक्कम, 1.68 कोटींची दारू व 29 लाख रुपयांच्या मादक पदार्थांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निकडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

केंद्रिय निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. तेव्हापासून महाराष्ट्रात आचारसंहिला लागू झाली आहे. गेल्या चार दिवसांत आयकर विभाग, उत्पादन शुल्क किभाग व पोलीस यंत्रणांनी केलेल्या कारवाईची माहिती अतिरिक्त मुख्य निकडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत रोख रक्कम, दारू, मादक पदार्थांबरोबर 46 लाख किमतीचे मौल्यवान दागिनेही जप्त केले आहेत. तसेच 50 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पेट्रोलपंपवरील बॅनर हटवले जाताहेत
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सरकारी, सार्वजनिक, खासगी ठिकाणी लावण्यात आलेल्या सरकारी व राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे होर्डिग्ज, फलक काढण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. आचारसंहितेनंतर राज्यातील पेट्रोलपंपावर बऱयाच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातींचे बॅनर काढले गेलेले नाहीत याबाबत निवडणूक अधिकाऱयांना विचारले असता, ते म्हणाले, आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जाहिरातींचे बॅनर, फलक काढले जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांना सतर्क केले आहे. राज्यात आतापर्यंत शासकिय जागेवरील 75 हजार 981, सार्वजनिक ठिकाणी 73 हजार 445 व 16 हजार 428 खासगी ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर, कटआउट, झेंडे काढण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेसाठी पांढरी व विधानसभेसाठी गुलाबी रंगाची स्लीप
राज्यात विधासभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हिएम व व्हिव्हिपॅटचे दोन संच ठेवण्यात येणार असून मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी लोकसभेसाठी असणाऱया मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहेत. तर विधानसभेसाठी असणाऱया यंत्राकर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. तसेच मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार आहे. मात्र, किधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या