यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

कोविडच्या प्रादुर्भावामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला नागपूरला होणार आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये थंडी असते. या काळात कोरोनाचा धोका वाढण्याची भीती असते. त्यातच हिवाळी अधिवेनशनाला गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्याची शिफारस राज्यपाल कोश्यारी यांना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत अधिवेशन घेण्याच्या दृष्टीने विधान भवनाच्या बाहेर मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या