बगॅसची वीज खरेदीचा महावितरणचा मार्ग मोकळा; वीज आयोगाची मंजुरी

145

उसाच्या चिपाडापासून बनवल्या जाणाऱ्या बगॅसच्या मदतीने तयार केली जाणारी वीज खरेदी करण्याचा महावितरणचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेच अपारंपरिक ऊर्जा खरेदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 50 मेगावॅट वीज खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.

वीज वितरण कंपन्यांना एकूण वीज वितरणाच्या सुमारे 3-4 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून तयार होणारी खरेदी करणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने नुकतेच 3 रुपये 56 पैसे प्रतियुनिट दराने विजेची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी वीज आयोगाकडे मंजुरीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर आयोगाने निर्णय देत वीज खरेदीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे महावितरणला दिलासा मिळाला असून बगॅसवर वीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांचीही आर्थिक कोंडी फुटणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या