मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण खटल्याची सुनावणी इन कॅमेरा नाही

280

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी अत्यंत पारदर्शी पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे या खटल्याची इन कॅमेरा सुनावणी होणार नाही, असे मुंबईतील विशेष न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या खटल्याची सुनावणी इन कॅमेरा केली जावी, अशी याचिका न्यायालयात केली होती. मात्र, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. पडाळकर यांनी ही मागणी फेटाळली. इन कॅमेरा सुनावणीत केवळ न्यायाधीश, वकील, आरोपी आणि साक्षीदार यांचाच सहभाग असतो. मीडिया आणि सर्वसामान्यांना न्यायालयात प्रवेश नसतो. 29 सप्टेंबर 2008ला मालेगावमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात मध्य प्रदेशच्या खासदार प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे आरोपी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या