तिने सांगितले म्हणून त्याने कपडे काढले आणि लफडा झाला

ऑनलाईन फसवणूक आणि व्हर्च्युअल सेक्सच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्हांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील आग्रीपाडामधील एक तरुणही व्हर्च्युअल सेक्सच्या जाळ्यात अडकला. त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

सोशल साईटवर आलेली एका महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. सोशल साईटवर त्याला एका महिलेने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्याने ती अॅक्सेप्ट केली. दोघांनी चॅटींग करुन एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर महिलेने त्याच्याशी जवळीक वाढवली आणि त्याला विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. त्याला चाळवले, त्यानेही त्याचे कपडे उतरवले आणि तो तिच्या जाळ्यात फसला.  तिने त्याला ब्लॅकमेल करुन 1500 हजार रुपये उकळले.

ही व्यक्ती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला एका महिलेकडून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती अॅक्सेप्ट केली आणि त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यांच्यातील जवळीक वाढल्यानंतर तिने त्या माणसाला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी ती महिला विवस्त्र झाली. मात्र, त्यावेळी तिने स्वतःचा चेहरा दाखवला नाही. या व्हिडीओ कॉलद्वारे तिने त्याला चाळवले आणि कपडे काढण्यास भाग पाडले आणि तो तिच्या जाळ्यात अडकला. तिने त्याचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला.

काहीवेळानंतर त्या महिलेने फोन करुन तिच्याकडे त्याचा विवस्त्र व्हिडीओ असल्याचे सांगितले. शिवाय व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर पैसे मोजावे लागतील अन्यथा तो व्हिडीओ ऑनलाईन अपलोड करीन अशी धमकी त्याला दिली. त्यासाठी त्याच्याकडे 31,500 हजारांची मागणी केली. तिची पैशांची मागणी ऐकून  त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.

सोशल मिडीयावर तो व्हिडीओ अपलोड करून नये, अशी विनंती त्याने केली. तसेच आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे त्याने सांगितले.  तिने लगेच पैसे कमी करत 20 हजारांची मागणी केली. मात्र ही रकमही आपल्याकडे नसल्याने त्याने सांगितले.  आपल्याकडे केवळ 1500 रुपये असल्याचे त्याने तिला सांगितले. ती ते पैसे घेण्यास तयार झाली. तिने लगेच अकाऊंट नंबर शेअर केला आणि त्याला त्या नंबरवर पैसे पाठवायला सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे  त्याच्या लक्षात आले. ती महिला आपल्याला पुन्हा ब्लॅकमेल करणार, अशी भीती त्याला होती. त्यामुळे त्याने थेट पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार नोंदवली. आग्रीपाडा पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तिने पाठवलेल्या अकाऊंट नंबरचा पोलिस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या