पुन्हा महेश मांजरेकर करणार बिग बॉसचे सूत्रसंचालन

27

सामना प्रतिनिधी। मुंबई

बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी सीझननंतर कलर्स मराठी आता घेऊन येत आहे ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमाचा सीझन दुसरा. पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाइलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळय़ांचीच मने जिंकली असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.

‘बिग बॉस मराठी सीझन 2’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले. महेश मांजरेकर या प्रोमोमध्ये एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले. आता हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडू शकतो की या वेळेस ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तर दिसणार नाही ना! संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सीझनसाठी. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये या वेळेस कोणत्या ख्यातनाम व्यक्ती जातील या विषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या