मॅरेथॉनसाठी सज्ज व्हा! एसिक्स इंडियाचे रजत खुराना यांच्या धावपटूंना मोलाच्या टीप्स

284

येत्या रविवारी मुंबईकरांसह जगभरातील अव्वल धावपटू, हौशे-नवशे-गवशे धावतील. पुरुषांप्रमाणे महिलांचाही या मानाच्या शर्यतीला उदंड प्रतिसाद असेल. याप्रसंगी एसिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराना यांनी या मॅरेथॉनसाठी महिलांनी कसे सज्ज व्हायला हवे याबाबत मोलाच्या टीप्स दिल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन महिलांप्रमाणे सर्वच धावपटूंसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

कसे बनाल यशस्वी धावपटू!

धावण्याच्या व्यायामासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम वेळ आहे. सकाळच्या शांत वेळेत तुमच्या शरीराचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका आणि हळुवार सुरुवात करून या प्रकारच्या व्यायामाला सरावण्यासाठा स्वतःला भरपूर वेळ द्या. धावायला सुरुवात करण्यापूर्वीच्या तासाभरात काही तरी खा. वाहन चालवायचे असेल तर इंधन पाहिजे. शरीराचेही तसेच आहे, पण धावण्याच्या वेळेला लागून काही खाणे योग्य नाही. त्यामुळे पोटरीत गोळे येण्याची शक्यता असते.

एकदा का छोटे अंतर धावायची सवय लागली की, 10 किमी वा त्यापुढील अंतरापर्यंत धावण्यासाठी सज्ज व्हा, परंतु धावत असताना शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. पळताना स्वतःसोबत पाण्याची बाटली ठेवायची की, पाणपोईपाशी थांबून पाणी प्यायचे हे ठरवा आणि त्याप्रमाणे तुमच्या प्रशिक्षणातच ही सवय अंगी बाणवा, जेणेकरून स्पर्धेच्या दिवशी तुमची त्या दृष्टीने तयारी झालेली असेल. एसिक्स जेल निंबसमध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे बूट आणि टाच यांच्या विलगीकरणावर निर्बंध येऊन त्यांच्यातील फिटिंग सुधारते. लांब अंतराच्या शर्यतीत मनातल्या मनात एकूण अंतराचे विविध टप्प्यांमध्ये विभाजन करणे अनेकदा उपयुक्त ठरते.

आपली प्रतिक्रिया द्या