आजपासून मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा

44
संग्रहित छायाचित्र

सामना ऑनलाईन, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानाच्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई उपनगर खो-खो संघटनेच्या यजमानपदाखाली दि. २० ते २३ एप्रिल १७ या कालावधीत स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान, कोकण नगर, अरुणोदय टॉवरच्या मागे, भांडुप (प.) येथे करण्यात आले आहे.

महापौर चषकाच्या निमित्ताने भांडुप नगरीत पहिल्यांदाच मॅटवर खो-खो सामने खेळवण्यात येणार असून त्याकरिता मॅटची दोन क्रीडांगणे बनविण्यात येत आहेत. निमंत्रितांच्या या स्पर्धेत पुरुष, महिला व व्यावसायिक गटाच्या तब्बल ३२ संघांचे ४४८ खेळाडू व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी भांडुपकरांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती मुंबई उपनगर खो-खो संघटनेचे कार्यवाह प्रशांत पाटणकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या