मेट्रोच्या कामगाराच्या हातातील पाना खाली पडल्याने कारचे नुकसान

499
प्रातिनिधीक

दहिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो-2बी’ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या डी. एन. नगर येथील साइटवरील कामगाराच्या हातातील नटबोल्टचा पाना उंचावरून खाली पडल्याने एमएच02-ईझेड-8695 क्रमांकाच्या कारच्या छताचे नुकसान झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 15 फूट उंचीवरून हा पाना कोसळल्याने कारच्या छतावरील काच फुटली. सुदैवाने आतील कोणालाही इजा पोहचली नाही. कार तातडीने शोरूममध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली. याप्रकरणी चौकशी सुरू असून कारमालकाला योग्य नुकसानभरपाई देण्यात येईल अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सह-प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या