वडाळा-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पाला 22 कोटींचे आर्थिक बळ

मुंबईतून वेगाने थेट पूर्व उपनगरात जाण्यासाठी आकार घेत असलेल्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड ठाणे कासारवडवली या मुंबई मेट्रो मार्ग चार या प्रकल्पासाठी 22 कोटी 50 लाख रुपयांची निधी मुंबई महानगर विकास प्राधिकरणास वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी अधिक गती मिळणार आहे.

मुंबईतील पायाभूत सुविधा मार्गी लावण्याबरोबर मेट्रोचे जाळे उभारण्यास महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य दिले आहे. त्याचा एक भाग म्हणून मुंबई मेट्रो मार्ग चार या वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासारवडवली या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. राज्य सरकारचे कर्ज व वित्तिय संस्थांच्या कर्जाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 2018-2019 या आर्थिक वर्षात 20 कोटी, 2019-20मध्ये 45 कोटी  असा एकूण 65 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर 2020-2021मध्ये 45 कोटी रुपये मंजूर मंजूर करण्यात आले आहेत. आता या तरतुदीमधून मुंबई मेट्रो चार प्रकल्पासाठी 22 कोटी 50 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला वितरित करण्यात येईल. मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांच्या कामांवर एमएमआरडीए चालू आर्थिक वर्षात  6 हजार 737 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी सर्वाधिक खर्च मेट्रो चार प्रकल्पाकर खर्च करणार आहे.

मुंबई मेट्रो प्रकल्प चार मार्ग कसा आहे

  • वडाळाघाटकोपरमुलुंडठाणेकासारवडवली
  • मेट्रो मार्गाची लांबी 33 किमी
  • मार्गावरील स्थानके-32
  • अंदाजित खर्चसुमारे 1 हजार 287 कोटी रु.
आपली प्रतिक्रिया द्या