पत्रांतून उलगडणार मिर्झा गालिब

291

उर्दू-फारसी शेरमधून जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान मांडणारे मिर्झा गालिब यांच्या पत्रांतूनच त्यांचा स्वभाव उलगडून दाखविण्याचा विशेष कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात येत्या 25 जानेवारी या दिवशी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. इतिहासाचे अभ्यासक व संशोधक मुरली रंगनाथन हे गालीब यांच्या पत्रांचे वाचन करतील. गालिब यांनी वयाच्या 11 व्या वर्षांपासून शेर लिहायला सुरुवात केली. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून वाक्यातून मांडल्या. त्यांनी एकूण 18 हजारपेक्षा अधिक शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच एक हजार ते 1200 शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिबच्या वाक्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. गालिब यांनी परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. गालिबच्या कवितांचा परिचय सेतू माधवराव पगडी, वसंत पोतदार आणि विद्याधर गोखले आदी मराठी लेखकांनी करून दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या