न्यू अहमदाबाद स्पोर्टस्, अधिरा चेंबूर अजिंक्य; राज्यस्तरीय आमदार चषकाला दणदणीत प्रतिसाद

250

सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने कन्नमवार नगर येथे रंगलेल्या राज्यस्तरीय आमदार सुनील राऊत चषकाला दणदणीत प्रतिसाद लाभला. महिला गटामध्ये न्यू अहमदाबाद स्पोर्टस् संघाने तर पुरुष गटामध्ये अधिरा 11 चेंबूर संघाने अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पुरुष गटामध्ये 24 संघांमध्ये तर महिला गटामध्ये आठ संघांमध्ये जेतेपदाची झुंज पाहायला मिळाली. महिला गटामध्ये सनरायझर्स लेडी मास्टर्स संघाने दुसरा तर पुरुष गटामध्ये ग्लोरिअस अंधेरी संघाने दुसरा क्रमांक पटकावला. साईकृपा विक्रोळी संघाने पुरुष गटात तिसरे स्थान मिळवले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विधानसभा संघटक संदीप सावंत, परम यादव, शाखाप्रमुख राजेश सोनावळे या मान्यवरांची उपस्थिती होती. विजय सोनमळे व सार्वजनिक उत्सव समितीतील सर्व पदाधिकाऱयांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. संदेश पाटील यांचे या स्पर्धेला सहकार्य लाभले. या स्पर्धेला परिसरातील क्रिकेटप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला.

आपली प्रतिक्रिया द्या