सवातीन लाख विद्यार्थ्यांना व्हायचेय बी. कॉम

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यंदाही आर्ट्स आणि सायन्सपेक्षा कॉमर्ससाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. सवातीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कॉमर्स प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया 29 मे ते 15 जून या कालावधीत राबवली होती. त्यात 2 लाख 62 हजार 128 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी 7 लाख 83 हजार 896 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील 3 लाख 28 हजार 690 विद्यार्थ्यांनी बी.कॉमच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. 18 जून ते 20 जूनदरम्यान कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

list