मातेने एक दिवसाच्या मुलीला फेकून दिले

277

नवजात बालिकेला मातेने घराच्या खिडकी बाहेर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार घाटकोपर येथे घडला. पण पंतनगर पोलिसांनी त्या निर्दयी मातेला शोधून काढले.

घाटकोपर पुर्वेकडील गौरीशंकर नगरात ननजात बालक फेकून दिलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिलाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबले, निरीक्षक रेणुका बुआ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल अंबवणे व पथकाने त्या फेकलेल्या अवस्थेत सापडलेल्या एक दिवसाच्या बालकाच्या पालकांचा शोध सुरु केला. तेव्हा त्याच परिसरात राहणारी एक महिला बाळंत झाल्याची माहिती पोलिसांनी काढली. त्या महिलेला विश्वासात घेउन चौकशी केल्यावर ते बाळ तिचे असल्याचे व तिनेच ते फेकल्याची कबूली दिली. महिला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल असल्याने पोलिसांना अधिक कारवाई करता आली नाही. तिने एक दिवसाच्या मुलीला का फेकले याचा तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या