दोन मुलांसह विवाहितेची आत्महत्या; तपास क्राइम ब्रँचमार्फत करा

387

पती तसेच सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह एका विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचमार्फत करण्यात यावा अशी मागणी करत महिलेच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे.  ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱया सीता वावीया (28) या विवाहितेने लक्ष (5) आणि रुद्र (4) या आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. पती तसेच सासऱयांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट पोलिसांना सापडल्याने कापूरबावडी पोलिसांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला; परंतु पोलीस आरोपींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहकार्य करत असल्याचा दावा विवाहितेचा भाऊ किशन अनवादिया यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या