तीन अंड्यांसाठी संगीतकाराला मोजावे लागले हजारो रुपये

1031

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस याने एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये दोन केळ्यांसाठी चौदाशे रुपये दिल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर आता तसाच काहीसा अनुभव संगीतकार विशाल-शेखर जोडीतल्या शेखर रविजानीला आला आहे. अहमदाबादमधील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये तीन उकडलेल्या अंड्यासाठी शेखरला 1,672 रुपये मोजावे लागले आहेत. एवढं बिल बघून शेखरला धक्काच बसला आहे. शेखरने याबाबत टि्वट केले असून त्यात हॉटेलचे बिल पोस्ट केले आहे.

शेखऱने शेअर केलेल्या बिलानुसार हॉटेल हयातने अंड्यासाठी तब्बल 1350 रुपये व त्यावर जीएसटी व सर्व्हिस चार्चजे 322 रुपये घेतले आहेत. बाजारात सध्या साठ ते सत्तर रुपयाला बारा अंडी मिळतात. बाजार भावानुसार 3 अंड्याचे अवघे 15 ते 20 रुपये होतील. मात्र या हॉटेलने तीन उकडलेल्या अंड्यासाठी लावलेला दर हा बाजार भावापेक्षा तब्बल शंभर पटीने जास्त आहे.

शेखरने शेअर केलेल ते बिल व्हायरल होत असून यूजर्स त्यावर मजेशीर कमेंटस करत आहेत. एकाने तर एवढ्या पैशात अंड्यांचं दुकानच विकत घेतलं असत, असं म्हटलं आहे. तर एकाने अंडी घरीच उकडून खात जा असा मजेशीर सल्लाही शेखरला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या