महाराष्ट्र भरारी पथकाची कामगिरी; मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त

परदेशातून आयात केलेले विविध ब्रँडचे मद्य ज्याची विक्री मध्य प्रदेशात होणे अपेक्षित होते, ते मद्य बेकायदेशीर रित्या बाळगून त्याची विक्री करण्यात येत होती. भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई करत हे मद्य जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अटक केलेल्यांवर महाराष्ट्र दारुंबदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणातील मद्यसाठी आणि स्विफ्ट डिझायर कार, हिरो स्प्लेंडर मोटारयाकलसह एकूण 1,00,24,000 रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. भरारी पथकाला 7 मार्चला नालासोपाऱ्यातील बिलालपाडा घरतवाडीतील क्रिकेट मैदानाच्या समोर उमर कपाउंड गाळा 1 मध्ये विविध बँडचे परदेशी मद्याचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने ही कारवाई केली आहे.

या करवाईत एकूण परदेशी मद्याच्या 1082 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या लेबलवर त्या मध्य प्रदेशात विक्रीसाठी असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यावर एमएसपी आणि एमआरपीही लिहिली आहे. हे मद्य मे. यु.एसएल. द्वारा ग्लोबल लॉजिस्टिक प्रालि. शिरढोण गाव, ता. पनवेल, जिल्हा रायगड यांनी आयत केल्याची माहिती मिळाली आहे.

0280c211-9bc9-471e-8b0e-5d4ffa3495ec

या प्रकरणी पुलकेश भुपेंद्राभआई पटेल, महेशभाई मोहनलाला शाह, मुकेशभाई विनोदभाई ठक्कर, नरेंद्रकुमार गोवर्धनभाई शहा, मुकुंद दिनेशभआई गांधी, महेश शांतीलाल पाबरी या सहा जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास संताजी लाड, निरीक्षक, राज्य उप्दान शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या