
मुंबईतील एका नामांकित शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. कांदिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेत शुक्रवारी सकाळी ईमेलद्वारे अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली. शाळा प्रशासनाने तात्काळ कांदिवली पोलिसांना याबाबत माहिती दिली. कांदिवली पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
शाळा आणि शाळेच्या परिसरात तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान दिल्ली आणि बंगळुरूतील शाळांनाही शुक्रवारी बॉम्बची धमकी मिळाली होती. मात्र पोलीस तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.