मुंबईत पुन्हा ओमायक्रॉनची दहशत, या व्हेरिएंटमुळे झपाट्याने वाढतेय रुग्णसंख्या

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून शास्त्रज्ञांनी काही रुग्णांच्या केलेल्या जिनोम सिक्वेंसिंग चाचणीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा XBB116 हा सब व्हेरिएंट आढळून आला असून हा सबव्हेरिएंटच वाढत्या रुग्णसंख्येचे मुख्य कारण आहे.

”तीन वर्ष आपण कोरोनाशी लढा देत आहोत. आता आपल्याला माहित आहे की ज्य़ेष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त आहे. हे सगळं आपण मास्क लावून व लस घेऊन थांबवू शकतो.” असे एचएन रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पंडीत यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान मोदी यांनीदेखील बैठक घेतली होती. ज्या आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे.