200 कोटींचा मालक, मात्र मृत्यूच्या वेळी होता एकटाच 

2754

मुंबईमधील नेपिअन सी रोड येथे राहणाऱ्या 200 कोटींच्या मालमत्तेचे मालक निखिल झवेरी यांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षांपासून झवेरी हे रुग्णालयात भरती होते. रुग्णालयात अखेरचा श्वास घेणाऱ्या झवेरी यांच्यासोबत मृत्यूच्या वेळी कुटूंबातील कोणताही सदस्य त्यांच्या जवळ नव्हता. निखिल झवेरी गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त होते. 2013 साली ते आपल्या बहिणीच्या घरी असताना कोणालाही न सांगताना अचानक कुठेतरी निघून गेले होते. त्यांचा शोध घेतला असता ते पोलिसांना बोरिवली येथे सापडले. पोलिसांनी त्यांना एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून एका आश्रमात पाठवले होते. जिथे 2014 मध्ये त्यांची ओळख पटविण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, झवेरी यांचे दोन विवाह झाले होते. दोन्ही पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा आहे, जो परदेशात राहतो. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नानंतर त्याच्या मुलगा रेयान याचा शोध घेऊन त्याला त्याच्या पित्याच्या मृत्यूची बातमी सांगितली. रेयान शुक्रवारी आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, झवेरी यांच्या संपत्तीवरून त्यांची पूर्व पत्नी, मुलगा आणि त्यांच्या बहिणीच्या पतींमध्ये विवाद सुरु झाला आहे. झवेरीची पहिली पत्नी दिप्ती पांचाळ यांनी त्यांच्या संपत्तीवर दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या