फडणवीसांना अपात्र घोषित करण्याची मागणी

4994

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली आहे. एॅड. उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मंजूर करण्याऱ्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उमेदवारी अर्जातील माहितीत अनेक उणिवा होत्या. त्याशिवाय शपथपत्रात आवश्यक असणारी माहिती नमूद केलेली नाही, असा दावा याचिकेत केला आहे. दरम्यान, अॅड. उके यांनी यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स पुरावे जप्त करावे, अशी विनंती करणारी याचिका दाखल होती परंतु सदर याचिका नंतर फेटाळून लावण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या