पीएमसी खातेधारकांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

1090

पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या (पीएमसी) खातेदारकांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी खातेधारकांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. रविवारी सकाळीच बँकेच्या खातेदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेऊन कार्यवाहीबद्दल आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या