कमला मिल आग, आरोपींना पकडून देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

सामना ऑनलाईन । मुंबई

कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला लागलेल्या १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अद्याप हाती न आलेल्या ३ आरोपींना पकडून देणाऱ्यास अथवा त्या आरोपींच्या ठावठिकाणाबाबत अचूक माहिती देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपींचे फोटो प्रसिद्ध करत मुंबई पोलिसांनी हे आवाहन केले आहे.

२८ डिसेंबरच्या रात्री दुर्घटना घडली. या घटनेला आठवडा उलटला तरी आरोपी सापडलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वन अबव्ह बारचे तीन आरोपी संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना पकडून देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्या विरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी देशाबाहेर जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीसही प्रसिद्ध केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या