शाहरुख खानचं घर ‘मन्नत’मध्ये घुसखोरी; सुरतचे 2 जण अटकेत

mannat shahrukh khan

वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या घरात घुसलेल्या दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असून, दोन्ही आरोपी 21 ते 25 वयोगटातील आहेत.

गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास दोघेही मन्नतच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, जिथे त्यांना शाहरुख खानच्या घराच्या सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि विचारपूस केली. संशयास्पदरित्या ‘मन्नत’मध्ये शिरलेल्या या दोघांना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या दोघांची प्राथमिक चौकशी करून अटक केली.