परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

761

संजय बर्वे हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून शनिवारी निवृत्त झाले. त्यांच्याजागी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहात आहेत.

ते आयुक्तपदी नियुक्त झाल्याने त्यांच्या जागी बिपीन.के.सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसंदर्भात काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘1988 च्या तुकडीतील परमबीर सिंहे , भापोसे, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र, मुंबई या पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची बदलीने नियुक्ती केली आहे. तसेच परमबीर सिंहे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या महासंचालक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार बिपीन सिंग, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक,विभाग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे.’

 

आपली प्रतिक्रिया द्या