
मुंबईत 28 मे ते 11 जून 2023 या कालावधीसाठी अचानक कडक निर्बंधाचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. पोलिसांच्या आदेश पत्रात म्हटल्यानुसार मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसंच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्याच्या पार्श्वभूमीव हे आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींनी बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावे असं जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे. 11 जूनपर्यंत शहरात हा आदेश लागू राहणार. शहरातील शांतता आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न, दंगली घडवण्याचा कोणताही प्रयत्न रोखण्याच्या हेतूनेच हा आदेश जारी करण्यात आल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्याची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Police issued prohibitory orders restricting the movement and unlawful assembly of five or more persons in anticipation of breach of peace, disturbance to public tranquility and danger to human lives. The order will remain in force in the city till June 11: Mumbai Police pic.twitter.com/0RcgA9IhaH
— ANI (@ANI) May 29, 2023
दरम्यान, लग्न समारंभ, शोकसमारंभ, विविध कोऑपरेटिव्ह सोसायट्या – संस्थाचे कार्यक्रम, चित्रपटगृह – नाट्यगृह, दुकाने, व्यवसायाची ठिकाणं यांना या आदेशातून वगळ्यात आलं आहे.