रवी पुजारीचा भाईगिरीचा माज उतरला

परदेशात बसून बॉलीवूड, उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्याबरोबर वेळप्रसंगी प्राणघातक हल्ले करून आपली दहशत निर्माण करणारा गँगस्टर रवी पुजारी आता एकदमच थंड पडला आहे. त्याच्यातली भाईगिरीची हवाच निघून गेली आहे.

90 च्या दशकात गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करणारा रवी पुजारी याने नंतर पुढे जाऊन स्वतःची टोळी सुरू केली. आपल्या नावाची दहशत निर्माण करण्यासाठी पुजारीने सर्व मार्ग वापरले. त्याने बॉलीवूड तसेच उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यालयांवर हस्तकांमार्फत हल्ले केले. परदेशात बसून रवी पुजारी आपल्या पंटरच्या माध्यमातून हिंदुस्थानात भाईगिरी करत होता, पण सेनेगलमध्ये पकडला गेल्यापासून रवी पुजारीची हवाच गूल झाली आहे. एक वर्ष सेनेगल पोलीस तर एक वर्ष बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात राहिल्यानंतर तो आता मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात आला आहे. खंडणीविरोधी पथकाने त्याची दहा गुह्यांत चौकशी सुरू केली आहे. पण दोन वर्षांपूर्वी दादागिरी करणाऱया रवी पुजारीची आता बोलती बंद झाली आहे. मुंबई पोलीस त्याला आता बोलते करू लागले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या