लवकरच 8 हजार पोलिसांची भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

1193

देशात शेतकरी आत्महत्येपेक्षा बेरोजगारांनी जास्त आत्महत्या केल्याचा अहवाल आल्यानंतर आता राज्य सरकारने तरुणांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आता गृह खात्याने लवकरच मेगा भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच 7 ते 8 हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती येथे दिली.

श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल देशमुख बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात मेगा भरती होईल असे सांगितले. रिक्त जागांवर भरती झाल्यास राज्यातील पोलीसांवरील ताण कमी होईल असे ते म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या