खात्री केल्याशिवाय काहीही पोस्ट करू नका, पोलिसांनी किरीट सोमय्यांचे धरले कान

10390

एक महिला अंमलदार श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रस्त्यातच एका स्कुटीचा आधार घेऊन बसल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला होता. भाजपाचे किरीट सोमय्या यांनी देखील कुठलीही खातरजमा न करता घाईगडबडीत तो व्हिडीओ ट्विट केला. मात्र हा व्हिडीओ जूना असून त्यातील अंमलदार ही ठणठणीत आहे. कृपया खातरजमा केल्याशिवाय अशा कुठल्याही पोस्ट व्हायरल करू नये असे मुंबई पोलिसांनी त्यावर ट्विट केले आहे.

किरीट सोमय्या यांनी त्या महिला अंमलदाराचा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर त्यावर पोलिसांनी रिट्विट करून त्या व्हिडीओची सत्यता समोर आणली. तो व्हिडीओ 16 मे चा आहे. त्यातील महिला अंमलदार ठणठणीत आहे. तिला काही झालेले नाही. तेव्हा असे व्हिडीओ किंवा पोस्ट जातरजमा केल्याशिवाय पोस्ट करू नये असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्यानंतर किरीट सोमय्या भलतेच ट्रोल झाले, अखेर त्यांनी ते ट्विट उडवले.

आपली प्रतिक्रिया द्या