‘द स्काय इज पिंक’मधून प्रियांका चोप्राचे बॉलिवुडमध्ये कमबॅक

सामना ऑनलाईन। मुंबई

निक जोन्सबरोबर लग्न झाल्यानंतर बॉलीवुडपासून दूर झालेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. प्रियांकाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो तिच्या आगामी ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातला असल्याचे बोलले जात आहे.

या फोटोत प्रियांकाने बॉब कट केलेला असून ती पाऊट करताना दिसत आहे. त्याचबरोबर सेमी फॉर्मल ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे. हा तिच्या ‘द स्काय इज पिंक चित्रपटातला लूक असल्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर, फरहान अख्तर आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत चमकणार आहेत. शोनाली बोस या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथा पल्मनरी फायब्रोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रेरणादायी भाषण देणाऱ्या आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित आहे. 11 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एका रॅप पार्टीत प्रियांका आणि चित्रपटाचा सगळा क्रू मजा मस्ती करत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. प्रियांका बॉलिवुडमध्ये कमबॅक करत असल्याने तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


View this post on Instagram

Stills from “The Sky is Pink” movie releasing on 11th October, 2019. Her comeback bollywood movie

A post shared by i love you Priyanka Chopra (@priyankachopra.updates) on