मुंबईतील तीनपैकी एक प्रौढ व्यक्तीची क्‍वालिटी ऑफ लाइफ आहे खराब, डॅनोन इंडिया आणि CIIचं सर्वेक्षण

शरीराला ऊर्जा देण्याचं मुख्य काम प्रथिने पार पाडतात. शरीरातील पेशींमध्ये ताकद भरण्याचं काम प्रथिने करतात. म्हणूनच नाश्त्यात भरपूर प्रथिनांचा समावेश करणं गरजेचं असतं.

डॅनोन इंडियाने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या सहकार्याने, प्रोटिन सप्ताहाच्या (TPW) पाचव्या वर्षाच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली, जो वार्षिक स्तरावर 24 – 30 जुलै मध्ये साजरा केला जातो, ज्यामध्ये प्रोटिन, सूक्ष्म पोषकांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता पसरवली जाते, जे निरोगी आणि अॅक्टिव्ह जीवनासाठी महत्त्वाचे आहे.

प्रश्नांच्या आधारे क्‍वालिटी ऑफ लाइफ (QoL) सर्वेक्षण उत्तर-दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या 4 भौगोलिक क्षेत्र दर्शविणाऱ्या दिल्ली, मुंबई, लखनौ, चेन्नई, इंदुर, हैदराबाद, कोलकाता आणि पाटणा या शहरांमधील 2762 हिंदुस्थानी नागरिकांचे नमूने घेऊन मे-जून 2021 मध्ये आयोजित केला होता.

शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि पर्यावरण या 4 QoL विषयांच्या सरासरी टक्केवारीच्या आधारे आणि प्रौढांना “चांगला” किंवा “निकृष्ट” QoL मध्ये वर्गीकृत करण्यासाठी आलेल्या कटऑफ गुणांच्या आधारे, खालील परिणाम समोर आले होते.

जवळपास दोनपैकी एक प्रौढाचा जीवनाचा दर्जा निकृष्ट आहे (46.2%)

बऱ्याच महिलांचा QoL पुरूषांपेक्षा निकृष्ट आहे (50.4% वि 42%) आणि त्याचप्रमाणे महिलांचा शारीरिक आरोग्य गुणांक पुरूषांपेक्षा कमी आहे

कोलकातामध्ये निकृष्ट जीवनदर्जा गुणांक असलेल्या प्रौढांची सर्वात जास्त (65%) नोंद झाली, त्यानंतर चेन्नई (49.8%), दिल्ली (48.5%), पाटणा (46.2%), हैदराबाद (44.4%), लखनौ (40%) आणि इंदुर (39.2%). मुंबईमध्ये जीवनाचा चांगला दर्जा असलेल्या प्रौढांची सर्वात जास्त (68%) नोंद झाली

देशभरात, सुमारे सर्वच (99%) प्रतिसादकर्त्यांनी मान्य केले आहे की, चांगला QoL असण्यासाठी शारीरिक आरोग्य आणि पोषण महत्त्वाची भूमिका पार पाडतो तर जवळपास 98% अभ्यासातील लोकांचे मत होते की, चांगला जीवनदर्जा असण्यासाठी प्रोटिन-समृद्ध आहार महत्त्वाचा आहे.

देशातील केवळ 9% प्रतिसादकर्त्यांनी प्रोटिनच्या दैनिक आवश्यकता पूर्ण केल्या (शिफारस केलेले आहाराचे प्रमाण). प्रतिकारशक्ती कार्य आणि एकूणच आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेल्या 10 सूक्ष्म पोषकांचे सेवन करण्यामध्ये सुद्धा मोठे अंतर दिसूनन आले.

आपली प्रतिक्रिया द्या