आरपीएफ जवानांनी लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली

834

मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या मस्जिद आणि स्टँडहर्स्ट रोड दरम्यान रुळांवर दोन ते फुटांपर्यंत पाणी आल्याने दोन‌ लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची मध्य रेल्वेच्या जवानांनी बुधवारी सायंकाळी सुखरूपपणे सुटका केली.

कोसळत असलेल्या पावसाने दुपारी सोसाट्याच्या वादळीवाऱ्यासह हजेरी लावल्याने स्टँडहर्स्ट रोड आणि मस्जिद दरम्यान रूळांवर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी भरले. संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान सीएस‌एमटीहून कर्जतला निघालेल्या एका लोकलचे मस्जिद स्थानकावर अर्धे डब्बे फलाटावर तर अर्धे डब्बे बाहेर अशा अवस्थेत ही लोकल अडकली, त्यातील दीडशे प्रवाशांना आरपीएफ जवानांनी तातडीने बाहेर काढले. परंतू टिटवाळाहून आलेली दुसरी लोकल स्टँडहर्स्ट रोड आणि मस्जिदच्या दरम्यान अडकून पडल्याने त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआर‌एफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले. परंतू प्रत्यक्षात ही टीम पोहोचण्याआधीच आरपीएफने त्यात अडकलेल्या चाळीस ते पन्नास प्रवाशांची सुखरूप सुटका केली. सीएस‌एमटी आरपीएफच्या इन्स्पेक्टर संदीप खिरीटकर यांच्या टीमने दोन ते फूट पाण्यात उतरून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

 

आपली प्रतिक्रिया द्या