Photo – मुंबई, ठाणे, नवी मुंबईत परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई भागात आज परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केली. (सर्व फोटो – रुपेश जाधव)

सकाळपासून आभाळ भरून आले होते आणि अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

मुंबई शहरात दादर, महालक्ष्मी, वरळी, मरिन लाइन्स, चर्चगेट, पेडर रोड परिसरातही जोरदार पाऊस कोसळत आहे.

जोरदार पावसामुळे ट्राफिक जाम झाल्याची परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत डोंबिवलीत 121.5 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.