या अभिनेत्रीचे आहे ‘राणा’सोबत अफेयर?

9381

बाहुबली हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन वर्ष उलटली असली तरी त्यातील कलाकारांची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेइतकीच खलनायकाची भूमिकाही गाजली. या चित्रपटातील खलनायक ‘भल्लालदेव’ म्हणजेच राणा दग्गुबती यांचे बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये रंगली आहे. रकुल प्रीत असे त्या अभिनेत्रीचे नाव असून तिने मात्र राणा हा तिचा चांगला मित्र असल्याचा दावा केला आहे.

rana-daggubati-new

गेल्या वर्षभरापासून राणा व रकुल प्रीत यांच्या अफेयरच्या चर्चा बीटाऊनमध्ये रंगली आहे. मात्र वेळोवेळी या दोघांनी त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे सांगितले आहे. सोफी चौधरीच्या एका कार्यक्रमात रकुलला राणाबाबत विचारण्यात आले तेव्हा देखील तिने त्यांच्यात फक्त मैत्री असल्याचे सांगितले आहे. ‘अरे बापरे, आमच्यात तसे काहीही नाही. आम्ही दोघे एकमेकांच्या शेजारी राहतो. आमच्या खास मित्र मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. राणा देखील माझा चांगला मित्र आहे. मी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली तेव्हापासून मी त्याला ओळखतेय’, असे रकुलने सांगितले.

 rakul-preet-1

आपली प्रतिक्रिया द्या