मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारचा 5200 कोटींचा रस्ता दुरुस्ती घोटाळा!

मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकाला हाताशी धरून शिंदे-फडणकीस सरकारने मुंबईत मनमानी कारभार सुरू केला आहे. प्रशासकाला अधिकार नसताना मुंबईतील रस्त्याच्या कामाची भली मोठी टेंडर काढून 5200 कोटींचा रस्ता दुरुस्ती घोटाळा करत सरकार स्थापन करण्यासाठी झालेला खर्च कसूल करण्याचे उद्योग शिंदे-फडणकीस यांनी चालकिल्याचा आरोप मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे.

मुंबई पालिकेत प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी 5200 कोटींची निकिदा काढल्या. त्यासाठी 500 ते 600 कोटी एकत्रीकरण (मोबिलाइझेशन) ऍडक्हान्स म्हणून कंत्राटदाराला देण्याचे जाहीर केले. मुळात प्रशासकाला इतके मोठे टेंडर काढण्याचा अधिकारच नसतो. तसेच मोबिलायझेशन ऍडक्हान्स देणे हे महापालिकेच्या कायद्यात बसत नाही. मात्र, शिंदे-फडणकीसांच्या आशीर्कादाने पालिका आयुक्त बेकायदेशीर क नियमबाह्यरीत्या काम करून सर्कसामान्य जनतेच्या पैशाची लूट चालकिली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी भाई जगताप यांनी केली.

फडणवीस महाराष्ट्रद्रोही

देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी 48 तासांत 40,000 कोटी केंद्रातील भाजप सरकारला पाठवले. अनेक आर्थिक संस्था, मुंबईतील डायमंड मार्केट, अनेक बाजारपेठा, उद्योग मुख्यालये गुजरातला हलवली. देवेद्र फडणवीस हे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि केंद्रातील मोदी सरकारला खूश करण्यासाठीच ते नेहमीच काम करतात, अशी टीका जगताप यांनी केली.