सॅमसंगचा दीड लाखाचा फोल्डेबल मोबाईल येतोय

400

सॅमसंगचा फोल्डेबल मोबाईल ‘गॅलेक्सी फोल्ड’ हिंदुस्थानी बाजारपेठेत दाखल झाला असून 4 ऑक्टोबरपासून या फोनची प्री-बुकिंग सुरू होणार आहे. सॅमसंगचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन असून याची किंमत 1.65 लाख इतकी आहे. गॅलेक्सी फोल्डची विक्री 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

गॅलेक्सी फोल्डमध्ये एकूण सहा कॅमेरे असून मोबाईल फोल्ड केल्यानंतर ट्रिपल रियर कॅमेरा वापरता येईल. यात 16 मेगा पिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा, 12 मेगा पिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, 12 मेगा पिक्सल टेलीफोटो कॅमेरा असेल. तसेच 10 मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेराही या फोनमध्ये आहे. मोबाईल अनफोल्ड केल्यावर आतल्या बाजूस दोन कॅमेरे असून पहिला 10 मेगा पिक्सल तर दुसरा 8 मेगा पिक्सलचा आहे.

सध्या हा मोबाईल 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोअरेजमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात दोन बॅटरीज देण्यात आला असून दोघांचीही क्षमता 4380 एमएएच आहे. वायरलेस चार्जिंगची सुविधाही फोनमध्ये आहे. गॅलेक्सी फोल्ड हा सॅमसंगचा चौथा 5 जी फोन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या