मुंबईत हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक

26567

मुंबई पोलिसांनी हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. गोरेगाव पूर्वमध्ये एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा नंगानाच सुरु होता. पोलिसांनी गुरुवारी रात्री येथे छापेमारी केली.  ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, अभिनेत्री अमृता धनोआ (32) आणि मॉडेल ऋचा सिंह अशी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणींची नावे आहेत. स्थानिक पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी डी. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गोरेगाव येथील फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी दोन तरुणी आणि दोन व्यक्तींना अटक केली आहे.

पोलिसांनी ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला. पोलीस अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या एका सप्लायरची संपर्क साधत त्याची भेट घेतली आणि त्यालाही अटक केली. यासह अन्य एकालाही अटक करण्यात आली आहे. दिंडोशी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक धनेंद्र कांबळे यांनी या छापेमारीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी कलम 370 (3) आणि 34 अन्वये, तसेच मानव तस्करी विरोधी कायदा कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या