आज दहिसरमध्ये महायुतीची जाहीर सभा

bjp-shivsena

सामना प्रतिनिधी। मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी रिंगणात आहेत. गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. 23 एप्रिलला अशोक वन, दहिसर पूर्व येथे संध्याकाळी 6 वाजता महायुतीची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात मोठी लगबग सुरू झाली आहे.

या सभेला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले येणार आहेत. आजपर्यंत गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या मुंबईतील पहिल्या विक्रमी मेळाव्यात गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, भाजप दिल्ली प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, महाराष्ट्र भाजप प्रवक्त्या शायना एन. सी. आदी मातब्बर मंडळी येऊन गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या