पुण्यानंतर मुंबईत धक्कादायक प्रकार घडला असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात एका 29 वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून
एबीपीच्या बातमीनुसार, ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली. ही पिडीत तरुणी सीएसएमटीच्या बाहेर एकटी होती. तिला एकटीला पाहून आरोपी तिच्याजवळ आला. आरोपी तिच्याजवळ येत असल्याचे पाहून तरुणीने आरडाओरड करायला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत आरोपीने तरुणीचे तोंड दाबले आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या टॅक्सी स्टॅण्डच्या मागे दोघा नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ती महिला त्यांच्या तावडीतून पळाली आणि त्यानंतर तिने स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
याप्रकरणाच्या पुढील तपासासाठी माता रमाबाऊ मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.