सिद्धिविनायक चरणी 35 किलो सोने दान

514

श्री सिद्धिविनायकाच्या चरणी एका भाविकाने तब्बल 35 किलो सोन्याचे दान दिले असून त्या दानशूराने त्याचे नाव मात्र गुप्त ठेवले आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत 14 कोटी रुपये आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने या सोन्यातून मुख्य गाभाऱयातील घुमट आणि दरवाजे यांना सुवर्णमुलामा दिला आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके मोठे सुवर्णदान आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या